Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Elevated Link Road: कटाई नाक्याला राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता लवकरच बांधण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरडीएकडून वन मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ६.७१ किमी लांबीचा हा रस्ता तयार झाल्यानंतर प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार
Navi Mumbai - Kalyan TravelSaam Tv
Published On

ठाण्यातील कटाई नाक्याजवळ नेहमी मोठी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक खूप त्रस्त झाले आहेत. या वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. कटाई नाक्याला राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडणारा उन्नत रस्ता बांधणाऱ्या एमएमआरडीएने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे वन मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ६.७१ किमी लांबीचा हा उन्नत मार्ग असणार आहे.

हा उन्नत कॉरिडॉर करण्यामागचा उद्देश नवी मुंबई, कल्याण -डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारेल. या ठिकाणी राहणाऱ्यांचा प्रवास सुसाटर आणि ट्रॅफिक मुक्त होईल. एमएमआरडीएने या उन्नत मार्गासाठी १९८२ कोटी रुपयांच्या किंमतीत अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला बांधकामाचे कंत्राट आधीच दिले आहे. सहा पदरी या उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रादेशिक विकासाला लक्षणीय चालना मिळेल अशी आशा आहे.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार
Mumbai 7 Ring Road: संपूर्ण मुंबई शहरात कुठेही एका तासात पोहोचता येणार; काय आहे MMRDA चा मास्टरप्लान? वाचा सविस्तर

एमएमआरडीएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वन मंजुरीचा प्रस्ताव नुकताच मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील कटाई जंक्शनला एनएच-४ म्हणजे मुंबई-पुणे महामार्ग जोडणारा लिंक रोड बांधण्यासाठी अंदाजे ०.८३२५ हेक्टर खारफुटीची जमीन वळवावी लागेल.

एमएमआरडीएने पर्यावरण मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, 'गेल्या काही दशकांमध्ये शहराची लोकसंख्या वाढली आहे. सध्याच्या पायाभूत सुविधांवर खूप ताण आहे. गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्ते अडवणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. याचा व्यवसाय आणि व्यापारावर अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम होतो.'

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार
MMRDA Develop 446 Villages : मुंबईजवळील ४४६ गावांचा चेहरामोहरा बदलणार, जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार; काय आहे डेव्हलप प्लान?

अफकॉन्स सध्या या उन्नत कॉरिडॉरचे डिझाइन आणि बांधकाम करत आहे. ज्यामध्ये ६ किलो मीटरचा व्हायाडक्ट, भारतीय रेल्वे आणि DFCCIL कॉरिडॉरवर १०० मीटरचा रेल्वे ओव्हरब्रिज, १.५८ किलो मीटरचा प्रवेश रॅम्प आणि ६.३२ किमीचे सेवा रस्ते यांचा समावेश आहे. या एकात्मिक प्रकल्पामुळे ऐरोली ते कटाई नाकापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारेल. ज्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील वाहतूक सुरळीत होईल.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार
MMRDA Develop 446 Villages : मुंबईजवळील ४४६ गावांचा चेहरामोहरा बदलणार, जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार; काय आहे डेव्हलप प्लान?

सध्या प्रवासी अनेकदा महापे मार्गे शिळफाटा येथे पोहोचण्यासाठी आणि नंतर कल्याण, डोंबिवली , बदलापूर आणि इतर भागात जाण्यासाठी लांब मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने एनएच-४ ते कटाई नाक्यापर्यंत (कल्याण-शील रोडवरील टोल नाक्याजवळ) थेट उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा रस्ता तयार झाल्यानंतर नवी मुंबईत ते कल्याणपर्यंतचा प्रवास सुसाट होईल.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार
Mumbai News : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, नवीन एक्सप्रेस वे तयार होतोय, MMRDA चा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com