Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Bareli Protest update : उत्तर प्रदेशच्या बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ झाला. याठिकाणी शेकडो आंदोलक रत्यावर उतरले. यावेळी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.
Bareli Protest news
Bareli Protest Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा गोंधळ झाला. नमाजानंतर शेकडो आंदोलक 'आय लव्ह मोहम्मद'चा बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले. रत्यावर गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेने बरेलीतील वातावरण तापलं आहे.

बरेलीत शुक्रवारची नमाज झाल्यानंतर 'आय लव्ह मोहम्मद' वादावरून मुस्लीम समाजातील लोकांनी आंदोलन केलं. बरेलीतील वेगवेगळ्यात भागातील लोकांनी शेकडोंच्या संख्येने पोस्टर बॅनर घेत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी यावेळी आंदोलकांना रोखण्याचाही प्रयत्न केला.

बरेलीच्या श्यामजंग भागात आंदोलनाकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी श्यामगंज भागात दुकाने बंद करण्यास सांगितली. यावेळी नौमहला मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते जमा झाले. आक्रमक झालेल्या आंदोलककर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर शेकडो आंदोलनकर्त्यांची घटनास्थळावरून धावाधाव झाली.

Bareli Protest news
Thane Municipal Corporation : महायुतीत रंगणार संघर्ष, ठाण्याचा गड कोण राखणार? ठाकरे बंधूंची जादू चालणार का?

मौलाना तौकीर रजा हे 'आय लव्ह मोहम्मद' प्रकरणात जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवेदन देणार होते. मात्र, मौलानांनी आंदोलनांची घोषणा केली. यानंतर उत्तर प्रदेश पोलीस हायअलर्टवर होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

Bareli Protest news
Ajit Pawar News : अजित पवारांची आगामी निवडणुकीसाठी गेमचेंजर खेळी; शरद पवार अन् भाजपचे २ बडे नेते फोडले

नेमकं काय घडलं?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामिया मैदान आमि बिहारीपूर या दोन्ही भागांना शुक्रवारी सकाळी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं. श्यमगंज मंडी येथील रोडवर बॅरिकेटसहित पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपार होताच लोक घरातून बाहेर पडले. त्यानंतर परिसरात वातावरण तापू लागलं होतं. दुपारच्या नमाजनंतर आंदोलक रस्त्यावर उतरले.

Bareli Protest news
Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

या आंदोलकांनी रस्त्यावर जोरदार नारेबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पुढे काही क्षणात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com