Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

Akola News : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा केल्याने २00 एकर शेत जमीन पाण्याखाली गेलं. याबाबत तहसीलदाराने मोठा खुलासा केला आहे.
Akola news
AkolaSaam tv
Published On
Summary

अकोल्यातील म्हैसांग येथे 200 एकर शेती पाण्याखाल

बांध घालून पाणी अडविल्याचा आरोप.

अकोल्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींची तपासणी त्याच अधिकाऱ्याकडून हितसंबंधाचा आरोप

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : जिल्ह्यातील म्हैसांग येथील शेतकऱ्यांच्या शेतीला सध्या अक्षरश: तलावाचं रूप आहे. एक मंडळ अधिकाऱ्यांनं आपल्या शेतात केलेल्या आगाऊपणामूळ शेतकऱ्यावर ही परिस्थिती ओलांडली आहे. गावाचे मंडळ अधिकारी असलेल्या शेख अन्सारोद्दीन आणि इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातला. त्यामुळं अडलेल्या पाण्यामुळे गावातील 40 ते 50 शेतकऱ्यांची जवळपास 200 एकर शेती पाण्याखाली गेली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या प्रश्नाचा तपास अधिकारी हाच मंडळ अधिकारी शेख अन्सारोद्दीन आहे. एकीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुरामुळे देशधडीला लागण्याच्या वाटेवर असताना म्हैसांगचे शेतकरी मात्र या मानवनिर्मित पुरामुळे मोठ्या संकटात सापडले.

खरीप आणि येणारा रब्बी हंगामामुळं इथला शेतकरी चिंतेत आहे. कारण, त्यांचं जवळपास 300 एकरातील संपुर्ण पिक पाण्याखाली आहे. जवळपास पाच ते सात फूट पाणी शेतात साचल आहे. शेतीच पाण्याखाली गेल्याने सर्व कामं ठप्प आहेय. या संदर्भात काल साम टीव्हीसह इतर प्रसार माध्यमांमध्ये बातमी दाखवली होती. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत तातडीने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात आज तहसीलदारांनी खुलासा सादर केला आहे. नेमकं काय म्हटले अकोल्याचे तहसीलदार पाहूया.

Akola news
S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

मजलापुर ते मैसांग शिवदांड रस्त्याबाबत दाखवलेल्या बातम्यानंतर त्याचा खुलासा तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केला आहे. म्हैसांग येथील गुलाब प्रल्हादराव लव्हाळे व इतर यांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी मजलापुर ते म्हैसांग शिवदांड रस्ता मोकळा करण्याबाबत अर्ज सादर केला. अर्जामध्ये नमूद केल्यानुसार, गटधारक शेतकऱ्यांची शेती शिवदांडाच्या उत्तर बाजूला आहे. त्यामुळे आमचा रस्ता बंद झाला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने गैरअर्जदार यांना नोटीस काढून 19 सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावले.

म्हैसांग येथील चार अर्जदार त्यावेळी हजर होते, तसेच मजलापुर येथील गैरअर्जदारही हजर होते. त्यांच्या जबाब मध्ये शेताच्या बाजूने म्हैसांग शिवदांड रस्ता 33 फुटाचा असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र, शेत रस्त्यावर खूप मोठा पाऊस झाल्याने पाणी साचले आहे त्या पाण्यामधून ये–जा करण्यास त्रास होत आहे. तरी तेहतीस फुटी रस्ता मोजणी करून द्यावा आणि आम्ही शेतकरी स्वखर्चातून साचलेले पाणी ज्या बाजूला थांबले आहे, त्या शेताच्या भागात नाली तयार करून म्हैसांग मेन रोड कडेने पाणी काढून देण्यास तयार आहोत.

Akola news
Relationship Tips : 34 ते 38 वयोगटातील महिला अफेअर का करतात? रिलेशनशिप कोचने सांगितलं सिक्रेट

जर रस्ता तयार करण्यासाठी लोक वर्गणी करणे आवश्यक असेल त्यालाही व नाली रस्त्याकडे काढण्यास तयारी दर्शवण्यात आली. शेत रस्त्यासाठी भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही व ज्यांना मंजूर नाही त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, असे नमूद करण्यात आले.

याप्रकरणी अर्जदार यांचे म्हणणे मांडण्यासाठी 26 सप्टेंबर ही तारीख ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येईल. या भागातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत, असे तहसीलदार सुरेश कवळे यांनी स्पष्ट केले आहे.

Akola news
Bihar Election 2025 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यावर बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी

50 च्या जवळपास शेतकरी चिंतेत; अन् तोच मंडळ अधिकारी करतोय तपास

पळसोबडे मंडळाचे मंडळ अधिकारी शेख अन्सारोद्दीन यांची शेती याच शिवारात असून त्यांनीसह अन्य काही शेतकऱ्यांच्या आपल्या शेतात मोठा मातीचा बांध टाकला. यामुळेच बांधावरची 200 एकर शेतीला तलावाचं स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात तपास अधिकारी याच गावाचे मंडळ अधिकारी हेच शेख अन्सारोद्दीन आहेय. त्यांनी आपल्या हिताचा अहवाल प्रशासनाला देत अन्याय केल्याचा आरोप शेतकरी करतायत. तर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या शेख अन्सारोद्दीन यांनी हे आरोप फेटाळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com