
न्यू जर्सी : अमेरिकेत एका लग्नासाठी आलेली २४ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. लिंडेनवोल्ड पोलिसांना सापडलेल्या तिच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मोबाईलमध्ये सारखी सतत बघत आहे. तसेच एका ठिकाणी ती कोणाची तरी वाट पाहत थांबलेली आहे. यावेळी ती संकटात वगैरे असल्याचं वाटत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
सिमरन नावाची तरुणी २० जून रोजी न्यू जर्सीला लग्नासाठी आली होती. तिला इंग्रजीही बोलता येत नाही आणि अमेरिकेत तिचे कोणी नातेवाईकही नाहीत. फक्त तिच्याकडे आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर चालणारा फोन आहे. तो देखील सध्या बंद येत आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पाच दिवसांनी, बुधवारी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनीच केली आहे. ती लग्नासाठी अमेरिकेत आली होती, असे तिच्या व्हिसावरून दिसत आहे, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे लग्न म्हणजे अमेरिकेला येण्यासाठी मोफत विमानभाडे मिळवण्यासाठी एक निमित्त होते का? असा संशय पोलिसांना येत आहे. याची शक्यताही अधिकारी तपासत आहेत. तिचा फोन केवळ वायफायद्वारेच नेटवर्कशी जोडला जाऊ शकतो.
या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, अधिकाऱ्यांना सिमरनच्या भारतातील कोणत्याही कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधता आलेला नाहीय. तिची माहिती मिळविण्यासाठी किंवा ती बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी संपर्क साधायला तिच्या कुटुंबातील कोणीही सापडलेलं नाही. तिला शेवटचं राखाडी स्वेटपँट, पांढरा टी-शर्ट, काळे फ्लिप-फ्लॉप अशा पेहरावात पाहिलं गेलं होतं. सिमरन ही लग्नाच्या निमित्ताने अमेरिकेत आली, फुकट प्रवास करता आला आणि आता ती तिच्या कोणीतरी ओळखीच्या, अफेअर असलेल्या व्यक्तीकडे अमेरिकेतच स्थायिक होण्यासाठी गेली असावी, असा संशय पोलिसांना आला आहे. अमेरिकेत लाखो भारतीय अवैध प्रवासी आहेत, सिमरनदेखील आता याच मार्गावर असल्याचा संशय पोलिसांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.