Good news for Konkan citizens Mumbai to Sindhudurg Flight regular Start to 1st september ganeshotsav 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Kokan News: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; १ सप्टेंबरपासून प्रवास होणार वेगवान

Mumbai to Sindhudurg Flight: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ सप्टेंबरपासून कोकणवासियांचा प्रवास आणखीच वेगवान होणार आहे.

Satish Daud

Mumbai to Sindhudurg Flight: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ सप्टेंबरपासून कोकणवासियांचा प्रवास आणखीच वेगवान होणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. (Latest Marathi News)

रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. राजीव गांधी भवन येथे झालेल्या बैठकीनंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता.

सततच्या पाठपुरावामुळे तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच खऱ्या अर्थाने कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला असल्याची भावना रविंद्र चव्हाण यांनी व्यक्‍त केली. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती.

मात्र, कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासियांचे तसेच मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवे संदर्भात भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शिंदे यांना सविस्तर माहिती दिली. येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरु करण्याची विनंती पालकमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत केली.

त्यानुसार येत्या 1 सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांव्दारे ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील असे आश्वासनही दिल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती व त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन केल्याची माहितीही त्‍यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या विषयामध्ये प्रयत्न केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT