Fake TC Arrested: अंगात टीसीचा युनिफॉर्म, रुबाबही दमदार; पण एका चुकीने अडकला अन् जेरबंद झाला

Mumbai Local Train Fake TC Arrested: विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस टीसीचे नाव आहे.
Kalyan News lohmarg police arrested fake tc robbing mumbai local Train passengers
Kalyan News lohmarg police arrested fake tc robbing mumbai local Train passengers Saam TV
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Mumbai Local Train Fake TC Arrested: अंगात टीसीचा युनिफॉर्म, गळ्यात बनावट आयडी कार्ड, रूबाबही तेवढाच दमदार. टीसी असल्याचं सांगत तो प्रवाशांकडून अवैधरित्या दंड वसूल करायचा. पण अति तिथे माती असाच प्रकार त्याच्यासोबत घडला. प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीतून हा बदमाश तोतया टीसी असल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)

विजय बहादूर सिंह (२१, रा. गणेशनगर ऐरोली, नवी मुंबई. मूळ गाव जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या बोगस टीसीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवा ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विजय हा अवैधरित्या दंड वसूल करायचा.

Kalyan News lohmarg police arrested fake tc robbing mumbai local Train passengers
Mumbai Crime News: मुंबई हादरली! २० वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार; चेंबुरमधील धक्कादायक घटना

यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) तपासाची चक्रे फिरवत मुंबईतील मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगईया यांच्याकडून विजयच्या नावाच्या टीसीची माहिती घेतली. खातरजमा केली असता, विजय सिंह नावाचा कोणताही टीसी नसल्याचे सांगण्यात आले.

यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने सापळा रचत विजय सिंह याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे टीसीचे बनावट आयडी कार्ड आढळून आले. लोहमार्ग पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याला प्रथम ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Kalyan News lohmarg police arrested fake tc robbing mumbai local Train passengers
Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंविरोधात FIR दाखल करण्यास उशीर; कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे, आयुक्तांना चौकशीचे आदेश

तेथे गुन्हा नोंदविल्यानंतर (Crime News) घटना कोपर ते डोंबिवली स्थानकांच्या दरम्यान घडली असल्याने हा गुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करून पुढील चौकशीसाठी या तोतयाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, अटकेची कारवाई केल्यानंतर शुक्रवारी आरोपीला लोहमार्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या बोगस टीसीने आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली? ओळखपत्र त्याने कुठून बनवून घेतले? यासंदर्भात तपास केला जात आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com