Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंविरोधात FIR दाखल करण्यास उशीर; कोर्टाचे पोलिसांवर ताशेरे, आयुक्तांना चौकशीचे आदेश

Sambhaji Bhide Latest News: संभाजी भिडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास उशीर का झाला, अशी विचारणा करत पनवेल सत्र न्यायालयाने नवी मुंबई आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
navi Mumbai Police delay in fir against sambhaji bhide panvel sessions court orders inquiry against cops
navi Mumbai Police delay in fir against sambhaji bhide panvel sessions court orders inquiry against copsSaam TV
Published On

Sambhaji Bhide Latest News: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास उशीर का झाला, अशी विचारणा करत पनवेल सत्र न्यायालयाने नवी मुंबई आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आक्षेपार्ह विधान केल्यानंतरही पोलीस संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नाही, असा आरोप करत अॅड. अमित कटारनवरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Latest Marathi News)

navi Mumbai Police delay in fir against sambhaji bhide panvel sessions court orders inquiry against cops
Bhima Patas Sugar Factory: भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का; भीमा पाटस साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश

या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. आक्षेपार्ह विधान केल्यानंतरही संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास एवढा उशीर का? अशी विचारणा पनवेल सत्र न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना केली.

इतकंच नाही, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा अंतर्गत संभाजी भिडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाच्या कारणांची प्रशासकीय चौकशी करा, असे आदेशही कोर्टाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे व्हिडीओ याचिकाकर्ते अमित कटारनवरे यांनी समाजमाध्यमांवर बघितले होते. यानंतर कटारनवरे यांनी 28 जुलै रोजी नवी मुंबई पोलिसांत धाव घेतली.

navi Mumbai Police delay in fir against sambhaji bhide panvel sessions court orders inquiry against cops
Prasad Lad News: 'माझ्या जीवाला धोका...' आमदार प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या भाषणाचे व्हिडीओ बघितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असं तक्रारदारास सांगितलं होतं. यानंतर यानंतर कटारनवरे यांनी पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण (सीपीआर), कोकण विभाग यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना या प्रकरणाची दखल घेण्याचे निर्देश दिले. मात्र, एफआयआर दाखल झाला नाही. वारंवार तक्रार करून देखील गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर कटारनवरे यांनी 2 ऑगस्ट रोजी पनवेल सत्र न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी 6 ऑगस्ट रोजी संभाजी भिडे यांच्याविरोधा पनवेल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. दरम्यान, भिडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास इतका विलंब का? अशी विचारणा करत कोर्टाने पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com