Bhima Patas Sugar Factory: भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का; भीमा पाटस साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश

Bhima Patas Sugar Factory Latest News: भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
Sugar Commissioner orders seizure of materials from Bhima Patas Sugar Factory
Sugar Commissioner orders seizure of materials from Bhima Patas Sugar FactorySaam TV
Published On

Bhima Patas Sugar Factory Latest News: भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवले असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनंतर आता साखर आयुक्तांनी भीमा पाटस साखर कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

Sugar Commissioner orders seizure of materials from Bhima Patas Sugar Factory
Maharashtra Politics: शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

दौंडचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमा पाटस साखर कारखान्याचा विषय चर्चेला आला होता. या साखर कारखान्यात ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) गाळपासाठी ऊस आणला होता, त्यांनी आमचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, यामधील काही शेतकऱ्यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती. आमचे पैसे तातडीने मिळवून द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान, साखर आयुक्तांनी यासंदर्भात भीमा पाटस साखर कारखान्याला (Bhima Patas Sugar Factory) नोटीस पाठवली होती.

Sugar Commissioner orders seizure of materials from Bhima Patas Sugar Factory
Jalna News: जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी, एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तुडवलं; पोलीस येताच काढला पळ

शेतकऱ्यांच्या या तक्रारीबाबत तातडीने खुलासा करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार? याबाबत तातडीने उत्तर द्यावं, अशी विचारणा नोटीशीमध्ये करण्यात आली होती. मात्र, याबाबत साखर कारखान्याकडून कुठलीही योग्य कारवाई करण्यात आली नाही. तसेच शेतकऱ्यांचे पैसे देखील परत केले नसल्याची माहिती आहे.

यानंतर आता साखर आयुक्तांनी यासंदर्भात कडक कारवाई करत भीमा पाटस साखर कारखान्यातील असलेल्या साहित्याच्या जप्तीचे आदेश दिलेले आहेत. या जप्तीच्या साहित्यातून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहे, एकंदरीत भाजप आमदार राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com