Jalna News: जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी, एकमेकांना लाथा बुक्क्यांनी तुडवलं; पोलीस येताच काढला पळ

Jalna Two Group Clash: जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. शहरातील गजबजलेल्या गांधी चमन चौकात हा प्रकार घडला आहे.
Jalna Crime News Two Group Fight in Gandhi Chaman Chowk Jalna City
Jalna Crime News Two Group Fight in Gandhi Chaman Chowk Jalna CitySaam TV
Published On

Jalna Two Group Clash: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. किरकोळ कारणावरून मारहाण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. शहरातील गजबजलेल्या गांधी चमन चौकात गुरूवारी रात्री हा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

Jalna Crime News Two Group Fight in Gandhi Chaman Chowk Jalna City
Food Poisoning: आदिवासी आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; ६ जणांची प्रकृती गंभीर, खळबळजनक घटना

दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना लोखंडी रॉडने मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. या घटनेत दोन दुचाकींचा चुराडा झाला असून काही तरुण देखील जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याचं पाहून हुल्लडबाज तरुणांनी पळ काढला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जालन्यातील (Jalna News) गांधी चमन चौकात गुरूवारी रात्रीच्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. काही तरुणांनी दुचाकींची देखील तोडफोड केली.

Jalna Crime News Two Group Fight in Gandhi Chaman Chowk Jalna City
Food Poisoning: आदिवासी आश्रम शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; ६ जणांची प्रकृती गंभीर, खळबळजनक घटना

यावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याचं पाहून दहशत माजवणाऱ्या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या हाणामारीत काही तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हाणामारीचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. सध्या परिसरात शांतता असून पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com