Maharashtra Politics: शरद पवार आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News: अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला
Maharashtra Politics minister chhagan bhujbal reaction on supriya sule statement Sharad Pawar Ajit Pawar
Maharashtra Politics minister chhagan bhujbal reaction on supriya sule statement Sharad Pawar Ajit PawarSaam TV
Published On

Maharashtra Political News: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी पक्षातून बंड करत शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या बंडाचं समर्थन केलं आहे. तर काही आमदार आणि पदाधिकारी अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं. (Latest Marathi News)

Maharashtra Politics minister chhagan bhujbal reaction on supriya sule statement Sharad Pawar Ajit Pawar
Bachchu Kadu Video: 'गुवाहाटीला जाण्यामुळे झालेल्या बदनामीची परवा नाही', बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...

राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार (Ajit Pawar) आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानाने शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार आणि  शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना विचारला. यावर उत्तर देताना, "सुप्रिया ताईंचे ते वडील आहेत आणि दुसरा भाऊ आहे. त्यामुळं सुप्रीया ताईंनाच जर माहिती नसेल ते एकत्र येणार आहेत की नाही? तर मला कसं माहिती असणार?" असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Maharashtra Politics minister chhagan bhujbal reaction on supriya sule statement Sharad Pawar Ajit Pawar
Kalyan Shil Road News: चांद्रयान सातशे कोटीत चंद्रावर पोहोचलं, तितकाच खर्च करूनही कल्याण-शीळ रस्ता अपूर्णच: आमदार राजू पाटील

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पुण्यात माध्यमांसोबत बोलत होत्या.

"भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याला थोड्या प्रमाणात यश आलं आहे. त्यातील काही जण सरकारमध्ये सहभागी आहेत. अजित पवार हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्ष विरोधात भूमिका घेतली असल्यानं त्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडं तक्रार केली आहे" असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com