Kalyan Shil Road News: चांद्रयान सातशे कोटीत चंद्रावर पोहोचलं, तितकाच खर्च करूनही कल्याण-शीळ रस्ता अपूर्णच: आमदार राजू पाटील

Mns Mla Raju Patil News: चांद्रयान सातशे कोटीत चंद्रावर पोहोचलं, तितकाच खर्च करूनही कल्याण-शीळ रस्ता अपूर्णच: आमदार राजू पाटील
Mns Mla Raju Patil
Mns Mla Raju PatilSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Kalyan Shilphata Road News: चांद्रयान सहाशे सातशे कोटी रुपयात जाऊन आले, मात्र तितक्याच खर्च असलेला कल्याण शीळ रोड अद्याप पूर्ण झालेला नाही. एमआयडीसीत रस्ते होतात. त्याचा समन्वय केडीएमसीशी नाही. केडीएमसीचा एमएमआरडीएशी समन्वय नाही, इथे फक्त टक्के वारी काढण्यासाठी कामे होत आहे. विकास होत नाही.प्रामाणिक पणे कुणी कामे करताना दिसत नाही, अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या विकासकामावरून आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह संबंधित यंत्रणाना लक्ष्य केलं

भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल पत्राच्या माध्यमातून मनसेला लक्ष्य केला होतं. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या टीकेला आज मनसे आमदार राजू पाटील यांनी खरमरीत उत्तर दिले.

Mns Mla Raju Patil
Ramdas Athawale News: रामदास आठवले यांच्यामुळे शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी युतीत रस्सीखेच

आमदार राजू पाटील यांनी आमचा पक्ष खळखट्याक करणारा पक्ष आहे. आम्ही तोडफोड करूनच 65 च्या आसपास टोलनाके बंद केलेत. यांना आंदोलन केलेले कळत नाही. टोलनाका फोडल्यावर एवढं कोणाचं काय कामात व्यत्यय येईल, असं काही नाही. जेसीबी फुटला ते आम्ही मान्य केलं. मात्र हेतू वाईट नाही. गणपतीमध्ये एक लाईन बनवणार याबद्दल त्यांचे स्वागत आहे. मात्र हा रस्ता टिकला पाहिजे. (Latest Marathi News)

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदला, अशी मागणी मनसे आमदार राजू यांनी केली होती. याबाबत बोलताना राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांशी माझं वैयक्तिक काही वाद नाही. ते खूप चांगली व्यक्ती आहेत. मात्र साताऱ्यावरून इथे यायला त्यांना वेळ मिळत नाही. तीन-चार वेळा बैठकी रद्द होतात. एका डीपीडीसीच्या बैठकीत काही मुद्दे मांडले असतील, त्याचे उत्तर विचारायला पालकमंत्र्यांचं पुन्हा येणं होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात एखादं मंत्रीपद द्या व त्यांना पालक मंत्री करा, असं ते म्हणाले.

Mns Mla Raju Patil
Uddhav Thackeray News: 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान', ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेचा टीझर लॉन्च

सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आज कल्याण शीळ रोडची पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. आमदार पाटील यांनी इथे सीएम डीसीएम मंत्री संत्री सगळं एकच माणूस आहे. इथे बाकी कुणी येणार नाही. आमच्या इथे ना पालकमंत्री येत आहेत, असे दौरे करायला. ना दुसरं कोणी. सगळं वाऱ्यावर सोडलं आहे. कल्याण लोकसभा पूर्णपणे वाऱ्यावर सोडली आहे. इथे कोणी वाली नाही, अशी टीका अप्रत्यक्ष रित्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com