Ramdas Athawale News: रामदास आठवले यांच्यामुळे शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी युतीत रस्सीखेच

Shirdi Lok Sabha Constituency News: रामदास आठवले यांच्यामुळे शिंदे गटाचं वाढलं टेन्शन, शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी युतीत रस्सीखेच
Ramdas Athawale News
Ramdas Athawale NewsSaam Tv
Published On

Shirdi Lok Sabha Constituency News: लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, मात्र शिर्डीच्या जागेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीतही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिर्डीच्या जागेसाठी आग्रही आहेत. तर महायुतीतील शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हे असतानाच रामदास आठवले यांनी देखील शिर्डीतून पुन्हा उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. शिवसेनेकडून उमेदवारी करत भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला आणि खासदार झाले. मात्र 2014 साली शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होऊनही भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र त्यांना सलग दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला.

Ramdas Athawale News
Uddhav Thackeray News: 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान', ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेचा टीझर लॉन्च

काँग्रेसनंतर भाजपमध्ये दाखल झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी आता पुन्हा घरवापसी केली असून शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. 2024 च्या लोकसभेसाठी उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा उमेदवारी देतील अशी अपेक्षा त्यांना आहे. वाकचौरे यांच्या घरपावसीने ठाकरे गटातही उत्साह संचारल्याचं दिसतंय.  (Latest Marathi News)

शिर्डी लोकसभेसाठी आत्तापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होत आलीय. मात्र यावेळी परिस्थिती बदलली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस म्हणून आमची भूमिका राहीलच. सेनेत कोणाला प्रवेश द्यावा कोणाला नाही हा त्या पक्षाचा विषय आहे. मात्र उमेदवारी ठरवताना आघाडीला विश्वासात घ्यावे लागेल. उमेदवार चालला पाहिजे अशीच अपेक्षा. शिर्डीची जागा कोणाकडे जाईल याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत काँग्रेसही शिर्डीच्या जागेवर दावा सांगू शकते असे संकेत दिले आहेत.

Ramdas Athawale News
Fake Lottery News: अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई, उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

2009 साली शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवाचे शल्य आजही रामदास आठवले यांना आहे. सध्या भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री असलेल्या आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com