Fake Lottery News: अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई, उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Ajit Pawar News: अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर होणार कडक कारवाई, उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
Fake Lottery News
Fake Lottery NewsSaam Tv
Published On

Fake Lottery News: महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, उपसचिव मनीषा कामठे, राज्य लॉटरी विक्रेता अध्यक्ष विलास सातार्डेकर यांच्यासह लॉटरी विक्रेते उपस्थित होते.

Fake Lottery News
Uddhav Thackeray News: 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान', ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेचा टीझर लॉन्च

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, राज्याचा महसूल वाढावा, नागरिकांचा लॉटरीवर विश्वास राहण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्याने लॉटरीला पोषक वातावरण आहे. यामुळे विशिष्ट प्रमाणात तिकीट विक्री झाल्यास बक्षिसावर हमी देण्याबाबतही चर्चा झाली. लॉटरीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी लॉटरीची जाहिरात करावी. परराज्यातील विक्रेत्यांकडील लॉटरीविषयी कराबाबतची थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. (Latest Marathi News)

Fake Lottery News
Navi Mumbai News: नवी मुंबईतील 35 हजार झोपडपट्टींचा पुनर्विकास कसा होणार?

अपर मुख्य सचिव सिंह यांनी सांगितले की, एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी करण्याबाबत प्लॅटफॉर्म तयार करून ऑनलाईन लॉटरी तिकीट विक्री करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com