Bachchu Kadu On Guwahati: गुवाहाटीला जाण्यामुळे आम्ही बदनाम झालो. पण या बदनामीची आम्हाला परवा नाही. कारण बदनामीच्या बदल्यात आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. आज ते सांगलीत दिव्यांग बांधवांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात असं म्हणाले आहेत.
यावेळी दिव्यांग मंत्रालय कसे स्थापन झाले, हे बच्चू कडू यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडे मी दहावेळा दिव्यांग मंत्रालय उभारा ही मागणी केली, पण ती पूर्ण झाली नाही. मात्र दिव्यांग मंत्रालय काही स्थापन झाले नाही, असं ते म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, योगायोगाने गुवाहाटीला जाताना जाण्याचा योग आला आणि यावेळी देवेंद्र फडणीस यांनी फोन करून आपल्या सोबत यावं असं म्हटलं. पण मी तुमच्यासोबत येतो, पण दिव्यांग मंत्रालय स्थापन करत असाल तरच येतो, नाहीतर तुमच्यासोबत येत नाही, असे मी सांगितले. (Latest Marathi News)
ते म्हणाले, दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी सांगितले की, तुम्हाला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायचा शब्द पूर्ण करायला हवा. तेव्हा मुख्यमंत्री शिंदेनी थेट मुख्य सचिवांना फोन करून कॅबिनेटची नोट बनवायली सांगितली. त्यामुळे एकनाथ शिंदेचे दिव्यांग मंत्रालय दिल्याबद्दल देखील बच्चू कडू यांनी आभार मानले.
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कल्याण विभागाकडून धनंजय गार्डन येथे आयोजित दिव्यांगाच्या दारी अभियान 2023 अंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.