मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार
प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी आणि अंतर ६ किमीने कमी होणार
दोन बोगदे आणि केबल-स्टेड पुलामुळे मार्ग अधिक सुरक्षित होईल
घाटातील अपघात आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता
मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षातील त्यांचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मिसिंग लिंकचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रोजेक्टमुळे प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होईल आणि या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी होणार नाही. त्याचसोबत मुंबई-पुणे प्रवास ६ किमीने कमी होईल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीमार्फत सुरू आहे. या मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत जानेवारी २०२६ पर्यंत होती. पण आता मुदत वाढ देण्यात आली होती. पण आता एप्रिल २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
या प्रोजेक्टचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केबल-स्टेड पूल हा पुढील काही आठवड्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. आव्हानात्मक भू-रचना, गुंतागुंतीचे अभियांत्रिकी आणि हवामानातील अडचणींमुळे वेळेत बदल झाला आहे. केबल स्टेड पुलाच्या दोन टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
या प्रोजेक्टअंतर्गत खालापूर टोल नाक्यापासून खोपोली एक्झिटपर्यंत एक्स्प्रेस वेचा विस्तार ६ लेनवरून ८ लेनपर्यंत करण्यात आला आहे. तसंच, खोपोली ते कुसगावपर्यंत १३.३ किलोमीटरचा एक नवीन संरेखन बांधण्यात येत आहे ज्यामध्ये दोन लांब बोगदे आणि दोन मोठे पूल यांचा समावेश आहे. या मिसिंग लिंकमुळे फक्त मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार नाही तर पुण्याच्या अर्थकारणाला गती मिळेल. पुण्यामध्ये गुंतवणूक वाढू शकते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तयार करण्यात येणाऱ्या मिसिंग लिंकमुळे नवीन मार्ग खूपच सरळ आणि सुरक्षित असेल. याठिकाणी दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या विद्युत आणि यांत्रिक चाचण्या सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.