Manasvi Choudhary
लोणावळा आणि खंडाळा हि ठिकाणे पर्यटकांसाठी अतिशय प्रसिद्ध ठिकाणे आहेत. निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी बाराही महिने पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.
लोणावळा, खंडाळाच नाही तर पुणे- मुंबईजवळीला काही ठिकाणे देखील प्रसिद्ध आहेत तुम्ही नवीन वर्षानिमित्त या ठिकाणांना भेट देऊ शकता.
माथेरानच्या पायथ्याशी असलेले मोरबे धरण हे देखील प्रसिद्ध ठिकाण आहे. हिरव्यागार निसर्गाच्या भागात या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.
पावसाळा आणि हिवाळ्यात माळशेज घाट येथील सौंदर्य खुलून येते. उंच टेकड्यावरून कोसळणारे धबधबे आणि धुके पाहून पर्यटक येथील नैसर्गिक सौंदर्यात हरवून जातात.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी सिटी प्रसिद्ध ठिकाण आहे. कसारा घाटापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण लोणावळ्यापेक्षाही सुंदर आहे.
पुण्याजवळील ताम्हिणी घाट हे नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं ठिकाण आहे. दाट जंगल, खोल दऱ्या असलेलं हे ठिकाणं पर्यटकांना भुरळ घालते.
जव्हार हे देखील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील धबधबे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला पर्यटकांची गर्दी होते.