Manasvi Choudhary
31st डिसेंबरच्या पार्टीसाठी तुम्ही घरच्या घरी हॉटेलसारखे पदार्थ बनवू शकता. व्हेजमध्ये तुम्ही खास पनीर टिक्का रेसिपी घरी बनवू शकता.
पनीर टिक्का घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर टिक्का बनवू शकता.
पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, दही, आले- लसूण पेस्ट, बेसन, मसाला, हळद, कस्तुरी मेथी, मोहरी तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वात पहिले एका मोठ्या भांड्यामध्ये दही मिक्स करा. नंतर त्यात आले- लसूण पेस्ट, बेसन, मसाला, हळद , मीठ आणि मोहरी तेल याचे मिश्रण तयार करा.
नंतर या संपूर्ण मिश्रणात पनीरचे चौकोनी तुकडे, गोल कापलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मिक्स करा. मसाला संपूर्ण भाज्यांमध्ये मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण मॅरिनेट करा आणि १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
गॅसवर पॅनमध्ये बटर लावा नंतर त्यावर मॅरिनेट केलेले पनीर फ्राय करायला ठेवा.
पनीर दोन्हीबाजूंनी चांगले खरपूस फ्राय करून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी पनीर टिक्का तयार होईल.