Manasvi Choudhary
बदलेली जीवनशैलीमुळे महिलांना वाढत्या वजनाचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यायामाचा अभाव, हार्मोन्स असंतुलन ही वजन वाढण्याची मुख्य कारणे आहेत.
तुम्हालाही घरच्या घरी वजन कमी करायचे असल्यास आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.
सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिक्स करू प्या यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
आहारात डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी, सोयाबीन यासांरख्या पदार्थांचा समावेश करा यामुळे भूक कमी लागते.
रात्रीचे जेवण झोपण्याआधी किमान ३ तास पहिले करा. जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका.
दररोज नियमितपणे ३० ते ४५ मिनिटे चालणे शरीरासाठी महत्वाचे आहे. चालणे हा वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे.
साखर, मैद्याचे पदार्थ, ब्रेड हे खाणे टाळा यामुळे वजन झपाट्याने वाढते. तसेच आहारात मिठाचे प्रमाण कमी करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या