Manasvi Choudhary
साखरपुडा म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर येते ती हिरव्या रंगाची साडी. हिरव्या रंगाची साडी प्रत्येक महिलेला आवडते.
हिरव्या रंगाच्या साडीमध्ये सुद्धा अनेक डिझाईन्स आहेत तुम्ही लग्नसमारंभासाठी खास अशाप्रकारे लूक करू शकता.
हिरव्या रंगाची बनारसी साडी अत्यंत सुंदर दिसते. बनारसी साडीवर तुम्ही हेव्ही दागिने देखील परिधान करू शकता.
ऑर्गेन्झा हिरवी साडी पण हलकी आणि स्टायलिश असते. या साडी पॅटर्नमध्ये फ्लोरल एम्ब्रॉयडरी किंवा हाताने वर्क केलेले असते.
साखरपुडा संध्याकाळी असल्यास तुम्ही सिक्विन हिरवी साडी ट्राय करू शकता. यावर स्टायलिश ब्लाऊझ देखील निवडू शकता.
साखरपुड्यासाठी पैठणी साडी हवी असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची मोर आणि पोपटाची नक्षी असलेली साडी निवडू शकता.
सिंपल पण सोबर लूकसाठी शिफॉन किंवा जॉर्जेटची हिरवी साडी निवडा. साडी साधी ठेवून त्यावर डिझायनर हेवी बॉर्डर आणि हेवी ब्लाउज परिधान करा.