Manasvi Choudhary
भारतीय संस्कृतीत सोन्याप्रमाणेच चांदीलाही विशेष महत्व आहे. शुभ कार्य, विधींना चांदीचा वापर केला जातो.
चांदीचे दागिने घालण्याचे देखील आरोग्यदायी फायदे आहेत. चांदीचे दागिने शरीरासाठी गुणकारी आहेत.
चांदीची दागिने घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेण्यास मदत होते. शरीराचे तापमान संतुलित राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा संबंध चंद्र ग्रहाशी आहे. ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा ज्यांचे मन चंचल असते अशा व्यक्तींनी चांदीचे दागिने घालावेत.
चांदीमध्ये जंतूनाशक शक्ती असते. चांदीचे दागिने घातल्याने बाह्य वातावरणातील बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होते.
चांदीचे जोडवे किंवा पैंजण घातल्याने पायांच्या नसांवर ठराविक दाब पडतो. यामुळे स्त्रियांमधील प्रजनन संस्था निरोगी राहते आणि रक्ताभिसरण सुधारते
चांदीमध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते. चांदीचे दागिने घातल्याने व्यक्तीभोवती एक संरक्षक कवच तयार होते, जे नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.