Manasvi Choudhary
मराठी मालिका विश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले. अनेक मराठी मालिकांमध्ये रूपाली भोसलेने अभिनय केला आहे.
आई कुठे काय करते ही रूपाली भोसलेची गाजलेली मालिका आहे. या मालिकेतून रूपाली भोसले घराघरात लोकप्रिय झाली.
अभिनयासोबत रूपाली भोसले तिच्या हटके फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते. रूपाली म्हणजेच संजनाच्या मंगळसूत्राची डिझाईन्स महिलांना आवडते.
मालिकेमध्ये संजनाचे पात्र हे कार्पोरेट क्षेत्रात काम करताना दाखवले आहे यामुळे तिची ज्वेलरी सुद्धी युनिक आणि फॅन्सी आहे.
संजना अनेकदा ऑफिसवेअर किंवा इंडो-वेस्टर्न कपड्यांवर लहान लांबीची मंगळसूत्रे घालताना दिसते. हे डिझाइन्स साधे पण दिसायला सुंदर वाटते.
मंगळसूत्रांमध्ये पारंपारिक वाट्यांच्या ऐवजी विविध आकाराचे पाने, फुले असलेले पेंडट दिसते यामुळे लूक वेगळा दिसतो.
नेहमीच्या दोन पदरी मंगळसूत्रापेक्षा संजना कधीकधी सिंगल लेयर किंवा नाजूक सोन्याच्या चैनमध्ये गुंफलेले काळे मणी असलेले मंगळसूत्र घालते.
संजना सणासुदीला किंवा लग्नाकार्यात पारंपारिक साडी नेसते, तेव्हा ती ठसठशीत आणि लांब मंगळसूत्र घालते, जे तिच्या लूकला पूर्णत्व देते.