Manasvi Choudhary
चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम येणे ही समस्या सामान्य आहे. मात्र सतत चेहऱ्यावर पिंपल्स आल्याने चेहरा खराब होऊ शकतो.
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
कडुलिंबामध्ये अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स पसरवणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश होतो यामुळे कडुलिंबाची पाने वाटून हळदीत मिक्स करून पेस्ट चेहऱ्याला लावा.
मुलतानी माती चेहऱ्यावरील तेलकटपणा शोषून घेते तुम्ही चेहऱ्यावर मुलतानी माती आणि गुलाब पाणी याची पेस्ट करून लावू शकता.
सुती कापडमध्ये बर्फ घेऊन त्याने हळूवार चेहऱ्याची मसाज केल्याने चेहऱ्यावरील सूज, पिंपल्स कमी होतील.
कोरफड त्वचेला थंडावा देते, तर टी-ट्री ऑईल पिंपल्सना मुळापासून उपटून टाकण्यास मदत करते. रात्री झोपताना कोरफड लावावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या