Manasvi Choudhary
सोमवार हा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे. सोमवारच्या दिवशी तुम्ही काही सोपे उपाय केल्याने तुमच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण होतील.
सोमवारी सकाळी स्नान केल्यावर शिव मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर शुद्ध जल किंवा गंगाजल अर्पण करावे.
शंकराच्या पिंडीवर बेलाचे पाने अर्पण करा यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
सोमवारी महादेवांना दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून बनवलेला पंचामृत अभिषेक करावा.
सोमवारी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच तांदूळ, पांढरे वस्त्र, दूध या वस्तू दान करा.
सोमवारी महादेवाच्या मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावाव आणि शिवचालिसाचे पठण करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.