Manasvi Choudhary
हिवाळ्यात हिरवा ओला वटाणाला मागणी असते. हिवाळ्यात ओल्या वटाण्यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता.
हिरवा ओला वटाण्याची नुसती भाजीच नाही तर तुम्ही मटार कचोरी, मटार पराठा, मटार पोहे, मटार अप्पे या चार रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
सकाळी नाश्त्याला तुम्ही कुरकुरीत ओल्या वटाण्याची कचोरी बनवू शकता. वटाणे, हिरवी मिरची आणि आले लसूण याची पेस्ट घालून केलेला सारण यामध्ये मिक्स करा.
रवा आणि दहीच्या मिश्रणात तुम्ही मटार, कांदा आणि कोथिंबीर याचे मिश्रण बारीक करून ते आप्पे बनवण्याच्या भांड्यात मिक्स करा आणि भाजून घ्या
मटार सोलून ते थोडे वाफवून घ्या नंतर त्यात हळद, मीठ, मसाला मिक्स करा. गव्हाच्या पिठामध्ये हे सारण मिक्स करून त्याचे पराठा तयार करा.
कांदापोहेमध्ये तुम्ही मटारची फोडणी दिल्यास पोह्यांची चव वाढते. यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि ओले खोबरे देखील मिक्स करू शकता.