Pune Ganeshotsav  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ganeshotsav 2024: रात्री १०पर्यंत परवानगी, मंडळात CCTV बंधनकारक, पुण्यातील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर; काय आहेत ११ अटी अन् शर्ती? वाचा सविस्तर...

Pune Ganpati Festival 2024: पुण्यातील गणशोत्सवात पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. २० ऑगस्ट २०२४

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सार्वजनिक गणपती मंडळांची लगबग सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुर झाले आहेत. यंदा  ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. गणपती मंडळांसोबतच प्रशासनाही १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाची तयारी सुरू केली असून पुणे शहरातील सार्वजनिक मंडळांसाठी मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत मार्गदर्शक सूचना तसेच नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

गणेशोत्सव २०२४

पुण्यातील गणशोत्सवात पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती.

पोलिसांकडून नियमावली जाहीर!

यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून, जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा, अशा सूचनादेखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन मंडळांच्या परवानगीसाठी प्रशासनाने अटी अन् शर्ती घालून दिल्या आहेत.

काय आहेत नियम अन् अटी?

१. २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना २०२६ पर्यंत (५ वर्षे) परवानगी.

२. नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे.

३. मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांपेक्षा जास्त आणि रुंदी १० फुटांपेक्षा जास्त नसावी.

४. रात्री १० पर्यंत कार्यक्रमांना परवानगी.

५ . कमान, स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना.

६. परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक.

७. गणेश मंडळात सीसीटीव्ही असणे बंधनकारक.

८. महिलांची छेडछाड होणार नाही याची याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे.

९. धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे.

१०. प्रखर बीम लाइट नको.

११. दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी.

दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाणार आहे. विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT