आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एनसीसीचे धडे देणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. घटनेबाबत कुणालाही सांगितल्या तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही संतापजनक घटना तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात घडली. अत्याचाराचे हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकासह 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवरामन (वय 30) असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी कृष्णगिरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकते.
ऑगस्ट महिन्यातील 5 तारखेला शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अल्पवयीन मुलीसह अन्य 16 विद्यार्थिनींचा सहभाग होता. सर्व एनसीसी कॅडेट शाळेतच राहायचे आणि सभागृहात झोपायचे.
यावेळी आरोपी शिवरामन यांने मध्यरात्री विद्यार्थिनीला सभागृहाबाहेर बोलावून घेतले. रात्रीच्या अंधारात त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास तुला शाळेतून काढून टाकेन. तसेच कुटुंबियांना जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने मुख्याद्यापकाकडे घडलेला प्रकार सांगितला. पण त्यांनी गप्प बसून प्रकरण दाबण्यास सांगितले. दरम्यान, शिबीर संपवून विद्यार्थी घरी पोहचले. तेव्हा पीडितेची तब्येत खराब झाली. तिला धड बसताही येत नव्हते. याबाबत पालकांनी तिला विचारले असता पीडितेने सर्व घटना सांगितली.
मुलीवर अत्याचार झाल्याचे कळताच पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याद्यापकासह 6 जणांना अटक केली. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.