Ganeshotsav Declared Maharashtra’s Official Festival Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Ganeshutsav : गणेशोत्सवासंदर्भात सर्वात मोठी बातमी, राज्य सरकारची मोठी घोषणा

Ganeshutsav 2025 : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! आशिष शेलार यांनी विधिमंडळात घोषणा केली की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा अधिकृत महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. भक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

Ganeshotsav Declared Maharashtra’s Official Festival : राज्यातील सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शलार यांनी गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव असेल, अशी घोषणा विधिमंडळात केली. भाजप आमदार हेमंत रासणे यांनी याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी गणेशभक्तांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा लाडके बप्पा १२ दिवस लवकर येणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गणेशोत्सवाला काही दिवस उरले असतानाच राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली. गणेशोत्स हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी विधिमंडळात घोषणा केली. शेलार यांच्या घोषणेनंतर गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आशिष शेलार काय म्हणाले ?

राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात येत आहे. काही लोकांनी वेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा आणली होती. पण या सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम आम्ही केले आहे, असे आशिष शेलार विधिमंडळात म्हणाले.

ठाकरेंना टोला, काय म्हणाले शेलार ?

देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवा बाबत स्पष्ट भूमिका घेतली. पीओपी मूर्ती बाबत निर्बंध हटवले. विसर्जन परंपरागत करण्याचे धोरण आम्ही न्यायालयासमोर मांडत आहोत. राज्य सरकारचे धोरण आडकाठीचे असणार नाही.

100 वर्षाच्या परंपरेला खंडित कोणी केला असेल तर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केले . लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी घेतली, असा टोला आशिष शेलार यांनी ठाकरेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT