Shreya Maskar
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्यासाठी शेवयाची खीर बनवा.
शेवयांची खीर बनवण्यासाठी दूध, शेवया, साखर, साजूक तूप, केशर, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.
शेवयांची खीर बनवण्यासाठी साजूक तुपात शेवया परतून घ्या.
एका पॅनमध्ये दूध उकळून शेवया शिजवा.
आता खीरमध्ये आवडीनुसार साखर आणि वेलची पूड घाला.
ड्रायफ्रूट्सचे तुकडे करून खीरमध्ये टाका, म्हणजे पदार्थाची चव आणखी वाढेल.
खीर पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करून त्यात केशर घाला.
तुम्ही शेवयांची खीर थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.