Shreya Maskar
टाकळ्याची भाजी बनवण्यासाठी टाकळा भाजी, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, मोहरी, हळद, लाल तिखट आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
टाकळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम टाकळा भाजीची पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या.
त्यानंतर कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी , हिरव्या मिरचीची फोडणी द्या.
आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसूण घालून परतून घ्या.
कांदा गोल्डन फ्राय झाला की यात हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
मिश्रणात चिरलेली टाकळ्याची भाजी टाकून १०-१५ मिनिटे शिजवा.
गरमागरम चपातीसोबत टाकळ्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.