Youth Attacks Mahatma Gandhi Statue  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Youth Attacks Mahatma Gandhi Statue: पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर तरुणाने कोयत्याने हल्ला केला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या तरुणाचे उत्तर प्रदेश कनेक्शन उघड झालेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी रात्री एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सूरज शुक्ला नावाच्या उत्तर प्रदेशातील एका तरुणाने हे धक्कादायक कृत्य केले. त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला सूरज शुक्ला हा तरुण पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर तो महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गेला. त्याठिकाणी असलेल्या चौथऱ्यावर चढला आणि तो गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला.

छाती आणि पायावर कोयत्याने वार -

सूरज शुक्लाने महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने जोरदार वार केले. यावेळी उपस्थित प्रवाशांनी घडलेला प्रकार पाहून तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सूरज शुक्ला या तरुणाला चौथऱ्यावरून खाली उतरवून ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुतळ्याच्या डोक्यावर होणारा संभाव्य हल्ला टळला.

कोण आहे सूरज शुक्ला?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सूरज शुक्ला हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. काही दिवसांपूर्वी तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याने हे कृत्य नेमके कोणत्या हेतूने केले किंवा तो कोणत्या संघटनेशी संबंधित आहे का? याचा तपास पुणे रेल्वे पोलिस करत आहेत. त्याच्याशी संबंधित काही ठोस माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांपुढे मोठं आव्हान -

या घटनेनंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देशाचे राष्ट्रपिता असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सार्वजनिक ठिकाणी असे हल्ले होणे हे चिंतेचा विषय मानले जात आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने पुण्यात आंदोलन देखील सुरू केले आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू -

सूरज शुक्लाच्या मानसिक स्थितीबाबतही तपास केला जात आहे. त्याने हे कृत्य आधीपासून नियोजित केले होते का? की अचानक मानसिक असंतुलनातून हे कृत्य घडले याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून आरोपी सूरज शुक्लाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT