
पुणे : पुण्यामधील कोंढव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणाला पोलिसांनी अटक न करता नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे आणि या फ्रकरणात आरोप करण्यात आलेला तरुण हा तरूणीचा मित्र असल्याचे समोर आल्यानं त्याला अटक न करता फक्त नोटीस बजावली आहे. तपासात सहकार्य करणं आणि बोलावल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट आले होते. तरुणीनं लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला होता. सोबतच तरुण हा तिचाच मित्र असल्याचं समोर आलं होतं. मात्र, तरुणीने जबाबात डिलिव्हरी बॉय असा उल्लेख केल्यानं या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्यानं घेऊन पोलिसांनी संपूर्ण सुत्र हलवली होती. स्प्रे मारणं किंवा फोटो काढल्याचं तरुणीनं खोटं सांगितल्याचं तपासात पुढे आलं होतं. या प्रकरणी तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५०० कॅमेरे तपासले होते. त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात देखील सुरूवातीला गंभीर आरोप करणाऱ्या तरूणीने सर्व गोष्टींचा खुसाला केल्यामुळे सत्य समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील पीडितेनं सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ हा प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. ४ जुलै शुक्रवारी या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. त्याचबरोबर तरूणीनं केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही. त्याचबरोबर, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच एडीट करून लिहिल्याची कबूली दिली आहे. असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या तपासामध्ये प्रकरण पुर्णपणे उलटं फिरल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.