Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Pune Daund Crime News : दत्तात्रय वाघ हा त्याच्या सलूनमध्ये शटर बंद करून आशुतोष भाकरे याचे केस कापत असताना अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रविंद्र गायकवाड, शारुख बाबू शेख आणि प्रशांत हनुमंत साठे हे तिघे दुकानामध्ये घुसले.
Pune Daund Crime News
Pune Daund Crime NewsSaam Tv News
Published On

सागर आव्हाड, साम टिव्ही

पुणे (दौंड) : प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता.शिरूर) येथे घडली आहे. येथील कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे थरार घडला असून, दुकानाची तोडफोड करून दुकान मालकाच्या हातावर आणि पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर हल्ला करून पळून जाणाऱ्या दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडलं आहे.

या प्रकरणी दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा.तामकरवाडी-टाकळी हाजी, ता.शिरूर, जि.पुणे) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जीवन रविंद्र गायकवाड (रा.कानगाव, ता.दौंड, जि.पुणे) याच्यासह शारुख बाबू शेख (वय २६) आणि प्रशांत हनुमंत साठे (वय १९) दोघेही (रा. पाटस, ता.दौंड, जि.पुणे) या तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वाघ हा पत्नी स्नेहा हिच्यासह टाकळीहाजी येथे वास्तव्यास असून, त्याचे कुडांई मेन्स पार्लर हे सलून दुकान आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाचे नातेवाईक प्रेम विवाहाच्या विरोधात होते. तसेच याआधीही स्नेहाचा मावसभाऊ जीवन रविंद्र गायकवाड आणि नात्यातील इतर व्यक्तींनी प्रेम विवाहामुळे दत्तात्रय वाघ याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यासंबंधी दत्तात्रय वाघ याने पोलिसांमध्ये तशी तक्रारही यापूर्वी दाखल केलेली आहे.

Pune Daund Crime News
Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

दत्तात्रय वाघ हा त्याच्या सलूनमध्ये शटर बंद करून आशुतोष भाकरे याचे केस कापत असताना अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रविंद्र गायकवाड, शारुख बाबू शेख आणि प्रशांत हनुमंत साठे हे तिघे दुकानामध्ये घुसले. त्यांनी दत्तात्रय याच्या दुकानाच्या काचा फोडल्या. त्याचप्रमाणे दुकानातील साहित्याची नासधूस केली आणि जीवन गायकवाडने लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केला. तिघं आरोपींनी दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी देऊन तीनही आरोपी मोटारसायकलवरून रांजणगावच्या दिशेने पळून जात असताना गावकऱ्यांनी पाठलाग करून दोन आरोपींना पकडून टाकळी हाजी पोलीस चौकीमध्ये आणलं.

दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नावं शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचं निष्पन्न झालं. तसेच जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघ याच्यावर हल्ला केल्याचंही आरोपींनी पोलिसांना सांगितलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दत्तात्रय वाघ याला शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्याच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गंभीर दुखापत, तोडफोड आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Daund Crime News
Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com