Harbour Line News
Harbour Line Saam tv

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Harbour Line News : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल झाले आहेत.
Published on

विकास मिरगणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असल्याने लोकल ट्रेनवर मोठा परिणाम झालाय. मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेन सकाळपासून उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दुसरीकडे जोरदार पाऊस सुरु असल्याने काही ठिकाणी रुळावर पाणी साचल्याचं बोललं जात आहे. यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत. आता यात आणखी भर पडली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साडे चार वाजल्यापासून नेरुळ स्टेशनजवळ रेल्वेची एक मशीन पडल्याने हार्बर आणि ट्रान्स मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि पनवेल ते बेलापूर सेवा सुरू आहेत. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरळ सेवा सुरू आहेत.

Harbour Line News
Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

नेरुळ ते पनवेल सेवा बंद आहेत. नेरुळ ते पनवेल मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे हार्बर मार्गावरील काही रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तसेच रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

Harbour Line News
Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त, कारण काय?

नेरुळ ते पनवेल सेवा बंद झाल्याने काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून प्रवास सुरु केला आहे. तर काही प्रवासी घरी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाकडे वळाले आहेत. तर अनेक प्रवासी रेल्वे स्टेशनवरच लोकल सुरु होण्याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, काही तासांपूर्वी नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील उभ्या असलेल्या रेल्वेवर स्टंट करताना ओव्हरहेड वायरला हात लागल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. हा मुलगा कोपरखैरणे येथील रहिवासी असल्याचे समजते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com