Pooja Khedkar  Saam Tv
मुंबई/पुणे

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Pune Police: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी चोरीची घटना घडली. चोरट्याने घरातील ५ सदस्यांना बेशुद्ध केलं आणि पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधून चोरी केली. घरातील सोनं आणि सर्वांचे मोबाईल घेऊन चोरटा फरार झाला.

Priya More

वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी झाली आहे. पुण्यातल्या औंध परिसरातील बंगल्यात मध्यरात्रीहा चोरीचा प्रकार घडला. चोरट्याने पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधून ठेवले आणि त्यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांना बेशुद्ध केले. हा चोरटा पूजा खेडकर यांच्या घरातील नोकरच आहे. हा चोरटा पूजा खेडकर यांच्या घरातील दागिने आणि सर्वांचे मोबाईल घेऊन पळून गेला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चतु:श्रृंगी पोलिस या प्रकरणाच तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास नॅशनल हाउसिंग सोसायटीतील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात ही चोरीची घटना घडली. पूजा खेडकर यांच्या घरी १ नेपाळी नोकर आठ दिवसांपूर्वीच आला होता. त्या नोकराने ही चोरी केली. या नोकराने पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर त्यांचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करून चोरी केली.

पूजा खेडकर यांनी फोन करून चतुःशृंगी पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता बंगल्याच्या कार पार्किंग परिसरात रखवालदार जितेंद्र सिंग हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तर पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांची खोली तपासली असता ते दोघेही पलंगावर बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसून आले.

पूजा खेडकर यांच्या घरातील लाकडी कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच बंगल्याच्या तळमजल्यावरील एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि बंगल्याबाहेरील एका खोलीत स्वयंपाकी सुजित रॉय हा देखील बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पूजा खेडकर यांचे आई-वडील आणि ३ कामगार हे बुशुद्धावस्थेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

आरोपीने पूजा खेडकर यांचे कुटुंबीय, वॉचमन आणि इतर नोकरांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याने पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधून ठेवले आणि घरातून दागिने आणि मोबाईल लंपास केले. सध्या पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूजा खेडकर यांच्या घरी आलेल्या नेपाळी नोकरावरच संशयाची सुई आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

Maharashtra Live News Update : पुण्यात मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी PMPML च्या १०५६ बसेस धावणार

गद्दार...महिलांनी हातात चपला घेतल्या; उपनगराध्यक्षपदावरून अंबरनाथमध्ये राडा, VIDEO

Beetroot Raita Recipe : पौष्टिक आणि चविष्ट बीटरुट रायता कसा बनवावा? लगेचच नोट करा रेसिपी

भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

SCROLL FOR NEXT