Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

Yavatmal Crime News: यवतमाळमधील एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक हत्येच्या घटनेने शहराला हादरवून सोडले आहे. कर्तव्यावर असताना परिचारिकेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.
NURSE Killed INSIDE PRIVATE HOSPITAL IN YAVATMAL, ACCUSED ABSCONDING
NURSE Killed INSIDE PRIVATE HOSPITAL IN YAVATMAL, ACCUSED ABSCONDING
Published On
Summary
  • यवतमाळमधील खासगी रुग्णालयात परिचारिका कुसुम चांदेकर यांची हत्या झाली.

  • कर्तव्यावर असताना धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

  • हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

संजय राठोड, साम प्रतिनिधी

यवतमाळ शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये नर्सवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या झाली आहे. कुसुम चांदेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कुसुम चांदेकर या रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिचारिका कुसुम चांदेकर यांची हत्या का करण्यात आली. याचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान या प्रकरणातील मारेकरी मात्र घटनास्थळावरून पसार झाला आहे. अवधूतवाडी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

NURSE Killed INSIDE PRIVATE HOSPITAL IN YAVATMAL, ACCUSED ABSCONDING
Shocking: विवाहित महिलेनं आधी स्वत:नं विष प्राशन केलं, नंतर ४ मुलांनाही पाजलं; रायगडमधील धक्कादायक घटना

पालघरमध्ये तरुणीवर कोयत्याने वार

अशीच एक घटना पालघरमध्ये शुक्रवारी घडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. तिच्या सहकाऱ्यानेच हा हल्ला केला होता. आरोपीचं नाव अमोल मुळे आहे तर हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचं नाव स्नेहल सावंत असं आहे. हाय कोर्टात शिपाई असलेला अमोल मुळे हल्ल्यानंतर फरार झाला आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

NURSE Killed INSIDE PRIVATE HOSPITAL IN YAVATMAL, ACCUSED ABSCONDING
Shocking: पुण्यातील आयटी इंजिनिअरची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिली कंपनीतील दोन महिलांची नावं, परिसरात खळबळ

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात शुक्रवारी सायंकाळी स्नेहल सावंत हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.आरोपीने मागून येत तिच्यावर अचानक हल्ला केला, त्याने तिच्या मानेवर आणि कंबरेवरही वार केलेत. या प्रकाराने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अमोल मुळे याने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली.

तिला नागरिकांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात नेलं. प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कार्यरत आहे. कामाच्या निमित्ताने तिची अमोल मुळेशी ओळख होती. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com