Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडली; आता पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरु

Pooja Khedkar House : पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. आता पोलिसांकडून आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Pooja Khedkar news
Pooja Khedkar CaseSaam Tv
Published On
Summary

पूजा खेडकरच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस फाडण्यात आलीये

पूजाचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर फरार?

पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा

खेडकरांच्या घराबाहेर आले जेवणाचे डबे

सचिन जाधव

बडतर्फ प्रशिक्षाणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या नवी मुंबई पोलिसांनी घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आलेली आहे. नवी मुंबईतून पूजाचे वडील दिलीप खेडकरांनी ट्रकच्या हेल्परचे अपहरण केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. तर पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या आणि कुत्री अंगावर सोडणाऱ्या मनोरमा खेडकरवर ही गुन्हा दाखल झाला आहे. पण पूजाचे आई-वडील अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह पसार झालेत. चतुर्श्रुंगी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पुण्यात गुन्हा दाखल

पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोहरमा खेरेकर यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 221 (शासकीय कामात अडथळा आणणे), कलम 238 (गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतून वाचवणे) आणि कलम 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित आहे.

या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोहरमा खेरेकर यांच्या घरी आणले होते. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणाचा मागोवा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांचा आरोप आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला.

Pooja Khedkar news
Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरी चौकशीसाठी पोलिस दाखल झाले आहेत. बाणेर रस्त्यावरील खेडकरच्या घरी पोलिस दाखल झाले. पोलिसांना सहकार्य केलं नसल्याच्या प्रकरणी पोलिसांची नोटीस देण्यात आली होती. पूजा खेडकरच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली आहे. यावेळी अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडलं. पोलिसांनी घरावर नोटीस लावून सहकार्य केले नाही तर ताब्यात घेण्याची नोटीस दिली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक,उप निरिक्षक,पोलिस कर्मचारी महिला कर्मचारी हे खेडकरच्या घरी पोहोचले आहेत.

Pooja Khedkar news
Sharad Pawar : राज्य सरकार एकाच जातीचे नाही, त्यांना प्रश्न सोडवायचे नसून...; शरद पवार स्पष्टच बोलले

खेडकरांच्या घरात जेवणाचे दोन डबे कोणासाठी पोहचले?

पूजा खेकडरच्या आई-वडिलांचा पोलिसांना शोध लागत नाही आहे. अशात खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहचले. गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवर डबे ठेवण्यात आले. काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ काढला. आता लपवाछपवी करणं खेडकरांसाठी नवं नाही. मात्र आज हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेलेत? पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं नाही ना? अशी चर्चा यानिमित्ताने केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com