Sharad Pawar : राज्य सरकार एकाच जातीचे नाही, त्यांना प्रश्न सोडवायचे नसून...; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar news : आरक्षणावरील राजकीय नेत्यांवरील आरोप-प्रत्यारोपांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. नाशिकमधील कार्यक्रमात शरद पवारांनी विरोधकांवर टीका केली.
Sharad Pawar NEWS
Sharad pawar newsSaam tv
Published On
Summary

गांधी-नेहरू विचारधारेचा वारसा आणि ऐतिहासिक अधिवेशनामुळे नाशिक हे ठिकाण निवडण्यात आल्याचं शरद पवारांनी म्हटलं

कांदा निर्यात बंदी, आत्महत्या आणि शेतकरी आंदोलन यावर शरद पवारांकडून सरकारवर टीका

सामाजिक वीण ढासळत असल्याचं शरद पवार म्हणाले

सरकार कुठल्याही प्रश्नांवर उपाय न करता समाजात फूट पाडत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला

नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वासर्वा शरद पवार यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. 'राज्य सरकार कुठल्याही एका जातीचे नाही. एकाकडून एक मागणी आल्यानंतर दुसरीकडून दुसऱ्या मागण्या येतात. त्यांना प्रश्न सोडवायचे नाही. तर वाढवायचे आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. ते नाशिकमध्ये बोलत होते.

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

हे ठिकाण का निवडलं असा प्रश्न विचारण्यात आला? महाराष्ट्रातील महत्वाच शहर नाशिक आहे. आपला पक्ष गांधी नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिकचा इतिहास पाहिला तर या जिल्ह्यात गांधी नेहरू विचारधारा या लोकांनी स्वीकारली होती. स्वातंत्र्याच्या पूर्वी नाशिकला एक अधिवेशन झालं होतं. वर्किंग कमिटी बैठक झाली होती. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. गांधी नेहरू विचार पुढे घेऊन जाण्यांच काम नाशिक करणी केलं. त्यानंतर भाऊराव हिरे, गोविंदराव देशपांडे यांनी विचारपुढे नेला.

मराठी साहित्यात योगदान देणारे अनेक लोक याठिकाणी होऊ गेले. महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत कुसुमाग्रज यांच नाव घेतल्याशिवाय साहित्य पूर्ण होतं नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा महाराष्ट्राला मोठा नेता मिळाला. राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा हा नेता होता. नाशिकचा इतिहास आहे म्हणून मला आनंद आहे. शशिकांत शिंदे यांनी याच ठिकाणी नियोजित केले.

सकाळपासून अनेकांची भाषणे ऐकली. सगळ्या लोकांनी भाषण केले. आपल्यासमोर विचार मांडले. उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. आज देशाची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त द्राक्ष आणि डाळिंब नाशिक देते. नाशिकचे शेतकरी अतिशय उत्तम शेती करता. त्याच्यामुळे शेतीवर नाशिककरांचे अधिक लक्ष असते. नुसतं लक्ष नाही आहे, तर शेतकऱ्यांचं प्रश्नांशी जाणं आहे.

जगात ज्याचे संशोधन होते. याची नोंद घेणारे शेतकरी नाशिकमध्ये आहेत. राज्यातील शेतकरी संघर्ष करतो. रस्त्यावर उतरतो. शरद जोशींनी शेतकऱ्यांचे संघटना नाशिकमधून उभी केली. देशात नाशिकमुळे कांद्याची चर्चा झाली, नाशिक कांद्याची निर्यात करणारा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात तीन जागा निवडून आल्या. तीनही जागा नाशिककरांनी निवडून दिल्या.

Sharad Pawar NEWS
India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

केंद्र सरकारने कांदा निर्यात करायची, त्याच्यावर बंधन आणली. सगळ्या दृष्टिकोनातून उदासीनता आहे. जिल्हा बँक संकटात आली. भारताशेजारच्या अत्यंत जवळच्या असलेल्या नेपाळाची अवस्था काय आहे आपल्याला माहिती आहे. बांगलादेश बघा. बांगलादेश आपल्याबरोबर राहिलेला नाही. श्रीलंका एकेकाळचा मित्र आपल्याबरोबर राहिलेला नाही. नरेंद्र मोदींच्या हातात देशाचे नेतृत्व आहे.

Sharad Pawar NEWS
Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

भारत शेतीप्रधान देश आहे. शेतीला जोड हा दुधाचा धंदा आहे. आठ महिन्यात ११८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर आपण लढायची तयारी ठेवली पाहिजे. राज्यात काही चांगले चित्र नाही. राज्यातील जिल्ह्यात वेगवेगळे वातावरण आहे. एका समाजाचा व्यवसाय आहे. तिथे दुसऱ्या समाजाचा व्यवसाय जात नाही अशी चर्चा आहे.

Sharad Pawar NEWS
Sanjay Shirsat News : झालं 'कल्याण' ! मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत, वाचा स्पेशल रिपोर्ट

पिढ्यांपिढ्या सोबत असलेली लोक एकमेकांबद्दल अविश्वास दाखवत आहे. आरक्षणाबाबतीत सवलती दिल्या. व्हीजेएनटी यांच्यात वेगळे धोरण टाकले जात आहे. महाराष्ट्रात बंजारा समाज एसटीमधून आरक्षण मिळण्यासाठी मागणी करत आहे. आदिवासींच्या कोट्यातून मागणी केली जात आहे. राज्य सरकार कुठल्या एका जातीचे नाही. एका कडून एक मागणी केली जात आहे. दुसरीकडून दुसऱ्या मागण्या येतात. त्यांना प्रश्न सोडवायचे नाही. तर वाढवायचे आहे. त्यांना योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. राज्याची सामाजिक वीण विस्कळीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com