Sanjay Shirsat News : झालं 'कल्याण' ! मंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Sanjay Shirsat News update : सामाजिक न्यायमंत्री पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत आणि यावेळचं कारण आहे उसतोड कामगार कल्याण महामंडळात झालेला घोटाळा...काय आहे हा घोटाळा...आणि काय आरोप आहेत संजय शिरसाट यांच्यावर पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये
Sanjay Shirsat News update
Sanjay Shirsat News updateSaam tv
Published On

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे नव्या घोटाळ्याच्या चक्रव्युहात अडकलेत.. शिरसाट यांच्या खात्याने ऊसतोड कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या गोपिनाथ मुंडे कामगार कल्याण महामंडळात तब्बल 22 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय..एवढंच नाही तर विजय कुंभार यांनी कथित घोटाळ्याची मोडस ऑपरेंडीच सांगितलीय..

2019 मध्ये गोपिनाथ मुंडे ऊसतोड विकास महामंडळाची स्थापना केली.. त्यानुसार ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना आयकार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला..त्याबाबत ग्रामसेवकांना जबाबदारी दिली.. त्यांनी फॉर्म तयार करुन ऊसतड कामगारांना ओळखपत्रं दिले... त्याची माहिती सरकारकडे आहे... असं असताना 6 जून 2025 ला पुन्हा एकदा 12 लाख 50 हजार ऊसतोड कामगारांचं सर्व्हेक्षण, नोंदणी आणि ओळखपत्रं वाटपासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला काम दिलं... त्यासाठी 21 कोटी 98 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रत्येक ओळखपत्रासाठी 175 रुपये 84 पैसे निश्चित करण्यात आले

Sanjay Shirsat News update
Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

जे टेंडर प्रक्रियेचे नियम अस्तित्वात नाहीत त्याचा भास करुन पूर्ण झालेल्या कामाचं पुन्हा टेंडर काढून पैसे उकळल्याचा आरोप विजय कुंभार यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर केलाय..

कुंभार यांनी केलेल्या आरोपासंर्दभात संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया मिळालेली नाही...

खरंतर संजय शिरसाट यांच्यावर आरोपांची ही पहिलीच वेळ नाही.. याआधीही शिरसाट वेगवेगळ्या आऱोपांमुळे अडचणीत आलेत...

शिरसाटांवरील आरोप कोणते?

विट्झ हॉटेल खरेदी गैरव्यवहार प्रकरण

शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनन्सची जागा लाटल्याचा आरोप

5 हजार कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याचा आरोप

घरात पैशांच्या बॅगा आढळल्याचा आरोप

Sanjay Shirsat News update
Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपामुळे सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..तसंच सतत होणाऱ्या आरोपांमुळे शिरसाट यांचा पाय खोलात चाललाय, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com