
अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक : वादग्रस्त आणि बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या क्रिमिलियर सर्टिफिकेटची सध्या तपासणी सुरू आहे. महसूल यंत्रणेकडून त्याबाबत गेले तीन महिने सखोल माहिती गोळा करण्यात आली होती. या संदर्भात प्रमाणपत्र रद्द का करू नये, याविषयीची सुनावणी आज मंगळवारी झाली. विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयात ही सुनावणी झाली. उपायुक्तांनी ही सुनावणी केली यावेळी पूजा खेडकर यांची अनुपस्थितीती होती त्यांच्यावतीने वकिलाने काही कागदपत्र सादर केली.
तर पूजा खेडकरच्या क्रिमिलियर सर्टिफिकेटबाबत अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. यामध्ये खेडकर कुटुंबीयांची संबंधित १२ प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे क्रिमिलियरच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत महसूल विभाग पूजा खेडकरचे क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द करण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकरला राज्य शासनाने यापूर्वीच बडतर्फ केलं आहे. त्यांच्याविरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तक्रार आहे. त्याविषयी दिल्ली उच्च न्यायालयात एक खटला देखील प्रलंबित आहे. पूजा खेडकर सध्या हंगामी जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान, एकंदरीत पूजा खेडकर यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे. त्यामुळे सातत्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. या स्थितीत पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.