Marine Drive police rescue: जिवाची बाजी लावून पोलिसांनी केलं रेस्क्यू; महिलेला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर, Video सोशल मीडियावर व्हायरल

Viral video Marine Drive rescue: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी दाखवलेलं धाडस सध्या चर्चेत आहे. एका महिलेला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढताना पोलिसांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य केले.
Marine Drive police rescue
Marine Drive police rescuesaam tv
Published On

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात एका महिलेचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. ४० वर्षीय ही महिला समुद्रात उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी प्रसांगावधान दाखवत तिला वेळीच पाण्यातून बाहेर काढलं असून तिचा जीव वाचवला आहे. मुख्य म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली होती. यावेळी पोलिसांनी तिला साहसाने वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.

समोर आलेल्या माहितीनुसार, या ४० वर्षीय महिलेचं नाव सैफी असं आहे. ही महिला मुंबईतील मालाड या परिसरात राहणारी आहे. गुरुवारच्या दिवशी दुपारी २ वाजता मरीन ड्राईव्हमध्ये ती पोहोचली होती. यावेळी ती अचानक समुद्रामध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करत असताना आढळून आलं

Marine Drive police rescue
Couple Tragedy : बायको ५ महिन्यांची प्रेग्नेंट, नवरा हनिमूनला घेऊन गेला, रोमान्स करताना रक्तस्त्राव झाला अन्...

यावेळी वेळ न दडवता नियंत्रण कक्षाने मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ‘मोबाईल युनिट ५’ ला लगेच अर्लट केलं. वायरलेसवरून मेसेज येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या साहसामुळे त्या महिलेचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. या महिलेचे प्राण पोलिसांनी कसे वाचवलेत याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Marine Drive police rescue
सोशल मीडियावर आणखी एका इन्फ्लुएन्सरचा MMS व्हायरल; 7:11 मिनिटांच्या व्हिडिओने मनोरंजन सृष्टीत खळबळ

सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

यावेळी पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने तिला बांधून वर खेचलं. समुद्रात जीव देण्यासाठी गेलेल्या या महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिला जवळच्या जीटी रूग्णालयात दाखल करण्या आलंय. तिच्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान या महिलेने असं टोकाचं पाऊल का उचललंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ४० वर्षीय महिला मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे तिने हे आत्महत्येसारखं पाऊल उचललं. मरीन ड्राईव्ह पोलीस सध्या तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधतण्याचा प्रयत्न करतायत. वेळेत मदतीला धावून जाणाऱ्या पोलीसांच्या या पथकाचं स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसतंय.

Marine Drive police rescue
Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com