Vashi Fire google
मुंबई/पुणे

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Diwali Tragedy: वाशी सेक्टर 14 मधील MGM कॉम्प्लेक्समध्ये दिवाळीच्या रात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू, शॉर्टसर्किट प्राथमिक कारण, अग्निशमन दलाने तिन्ही तासांत आग नियंत्रणात आणली.

Sakshi Sunil Jadhav

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

वाशी सेक्टर 14 मधील एमजीएम कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीचं कारण समोर आलं आहे. दिवाळीच्या रोषणाईत झालेल्या शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलानं व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहाव्या मजल्यावरील 80 वर्षांचे वृद्ध महिलेसह बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या 40 वर्षीय पूजा राजन तिचे पती 40 वर्षीय सुंदर पालक कृष्णन व त्यांची सहा वर्षाची चिमुकली वेदिका या तिघांचा या आगीत मृत्यू झाला आहे. . तसेच एक दांपत्य यांचा समावेश आहे.

रहेजा रेसिडेन्सी या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. सुसाट वाऱ्यामुळे आग 11 व्या आणि 12 व्या मजल्यावरही पसरली. अकराव्या मजल्यावरील तीनही कुटुंबीयांनी वेळेत इमारतीबाहेर धाव घेतली. मात्र 12 व्या मजल्यावर राहणारे सुंदर कृष्णन (45), पूजा आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी बैठका यांनी घरातील बाथरूममध्ये आसरा घेतल्याने गुदमरून मृत्यू झाला.

आग तीन तासांहून अधिक काळ धगधगत होती. घटनास्थळी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. पालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत आढावा घेतला. प्राथमिक तपासात इमारतीत व्हेंटिलेशनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे शहरातील सर्व उंच इमारतींच्या व्हेंटिलेशन आणि सुरक्षा ऑडिटची तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या घटनेत सुमारे दहा जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचीमाहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT