Raj-Uddhav Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Saam Tv Exit Poll: मुंबई ठाकरेंच्या हातून जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, पाहा महायुतीला किती मिळणार जागा?

BMC Election 2026: सकाळच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या हातामध्ये असलेली मुंबई महानगर पालिका महायुतीच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले

  • साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुती आघाडीवर आहे

  • भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज

  • मुंबई महानगर पालिकेवर महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधुंनी एकत्रित येत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जोर दिला. तर भाजपने मुंबई महानगर पालिका जिंकण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. मुंबई महानगर पालिका निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र म्हणजेच शिवसेना-मनसेने युती करत लढवली. शिवसेना- मनसेने राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेत निवडणूक लढवली. भाजप- शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने रिपाईला सोबत घेत एकत्र निवडणूक लढवली.

तर काँग्रेसने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले आता अवघ्या काही तासांमध्ये निकाल समोर येईल. मुंबई महानगर पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ माध्यम समूहाने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचा सर्व्हे केला. यामध्ये कुणाची सत्ता येईल याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा विजय होताना दिसत आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व होते. ही महानगर पालिका काबिज करण्यास महायुतीला यश मिळण्याची शक्यता आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगर पालिकेवर महायुतीच सत्ता येण्याचा अंदाज आहे.

सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीमधील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईतील ८४ वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे ३५ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

तर मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना हा दोन नंबरचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. ठाकरेसेनेला ६५ वॉर्डमध्ये यश येण्याची शक्यता आहे. ठाकरेसेनेचे ६५ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर मनसेचे १० आणि काँग्रेसचे २० उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत 'बेस्ट' बसने करा मोफत प्रवास

Amboli Recipe: कोकणातली स्पेशल मऊ, लुसलुशीत अन् जाळीदार आंबोळी कशी बनवायची? वाचा रेसिपी

Yoga Poses For Hunchback: पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी करा ही 5 योगासने

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भरधाव कारची ४ दुचाकींना धडक, २ जण जखमी

Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

SCROLL FOR NEXT