Manasvi Choudhary
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत २२७ प्रभांगासाठी १७०० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई महापालिकेतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहेत हे जाणून घेऊयात.
मुंबईच्या श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे समाधान सरवणकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी महापौर श्रध्दा जाधव यांची नावे आहेत.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे समाधान सरवणकर यांची एकूण मालमत्ता ४६ कोटी ५९ लाख रुपये आहे.
तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी महापौर श्रध्दा जाधव यांची एकूण मालमत्ता ४६ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्या मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.