Manasvi Choudhary
सध्या राज्यातील सर्वांचेच लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे लागले आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा जाहीर केल्यानंतर राज्यात (मॉडेल कोड ऑफ कंडक्ट) अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत याच नियमांना आचारसंहिता असे म्हणतात.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केलं तर निवडणूक आयोग कारवाई करते.
अशातच निवडणूक आयोगाने आचरसंहिता घातल्याने काय करावे आणि काय करू नये हे जाणून घ्या.
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. कोणत्याही सरकारी कार्यालयाचे, कामांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रम करता येत नाही.
सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
कुठल्याही पक्षाची प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असल्यास तर पोलिसांची परवानगी घेणे महत्वाचे आहे. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर, भिंतीवर राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर पत्रक लावण्यापूर्वी त्या व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे.
कोणत्याही पक्षाचा प्रचार सुरू असताना किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी.