Manasvi Choudhary
एरंडेल तेल त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. थंडीत एरंडेल तेल लावल्याने त्वचा मॉईश्चराइझ करते.
हिवाळ्यात वातावरणातील बदलांचा त्वचेवर परिणाम होतो त्वचा कोरडी होते अशावेळी तुम्ही एरंडेल तेलाने मालिश करा.
एरंडेल तेलाने त्वचेला मालिश केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार राहते त्वचेवरील डाग कमी होतात.
रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्याने एरंडेल तेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा.
एरंडेल तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटीअॅसिड असतात जे त्वचेवरील मुरूम लवकर बरे करतात.
त्वचेवर एरंडेल तेल लावल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. थंडीत ओठ फुटण्याची समस्या असल्यास एरंडेल तेल ओठांना लावा यामुळे आराम मिळेल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.