Manasvi Choudhary
हिवाळ्यात कोरड्या वातावरणामुळे केस गळतीच्या समस्या भेडसावतात. हवामानातील बदल, अयोग्य आहारा यामुळे केसांवर परिणाम होतो.
केसगळती कमी होण्यासाठी केसांची तेलाने मालिश करणे फायद्याचे ठरेल.
बाजारातील केमिकलयुक्त तेलाचा वापर करण्यापेक्षा घरीच तयार केलेलं औषधी तेल फायदेशीर होईल.
मेथी केसांच्या समस्यासाठी गुणकारी आहे मेथीचे तेल केसांसाठी वापरल्यास अनेक समस्या दूर होतात.
मेथीमध्ये अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी- फंगल गुणधर्म असतात यामुळे स्कॅल्प इंफेक्शनचा धोका कमी होतो.
मेथीच्या बियांमध्ये विटामिन ए, के आणि सी असते यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होते.
मेथीमध्ये कडीपत्ता मिक्स करून केसांना लावल्यास केसांचा काळा रंग टिकून राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.