BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर
BMC ElectionSaam Tv

BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर

Mumbai Politics: बोरीवलीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भाजप उमेदवाराने नागरिकांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी केला. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. त्यामुळे बोरिवलीमध्ये तणावाचे वातावरण आहे.
Published on

Summary -

  • बोरीवलीमध्ये भाजपकडून पैसे वाटप

  • भाजप उमेदवाराकडून पैसे वाटल्याचा आरोप

  • शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी केला आरोप

  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपने नागरिकांना पैसे वाटल्याचा आरोप मनसे-शिवसेनेकडून करण्यात आला आहे. बोरीवली पूर्व येथील गावकर हॉलमध्ये, बोरीवली ईस्ट–वेस्ट ब्रिजखाली भाजप उमेदवार सीमा किरण शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जेवणाच्या कार्यक्रमात कथितपणे मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केला आहे.

मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमात अनेक नागरिक वाहनांतून येऊन थेट हॉलमध्ये जात होते. काही वेळातच पैसे घेऊन बाहेर पडत होते, कोणतेही जेवण किंवा संवाद न करता हा व्यवहार सुरू असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमस्थळी गोंधळ होऊ नये यासाठी काही संशयित व्यक्तींना गेटवर उभे करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर
BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

“विकासाच्या नावावर मते मागणाऱ्या भाजपला पैसे वाटण्याची गरज का भासते?”, असा सवाल मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी उपस्थित केला आहे. लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाबाबत अद्याप भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर
BMC ELection : 'व्होट बँक' की शहरावर कब्जा? मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com