दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray Warning On Duplicate Voters In Mumbai: शिवाजी पार्कमधील संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर संताप व्यक्त करत मनसे व शिवसैनिकांना मतदान केंद्रांबाहेर लक्ष ठेवण्याचा आदेश दिला.

दुबार मतदार आढळले तर त्याला जागेवर फोडून काढा असा थेट आदेश राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधून मनसे आणि शिवसैनिकांना दिला. मुंबई येथील शिवाजी पार्कमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची सभा पार पडत आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी अदानीचा व्हिडिओ दाखवत उपस्थितांच्या अंगाला काटाच आणला. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना देखील एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक दुबार मतदारयाद्यांचा घोळ हा विरोधी पक्षाने समोर आणला होता. यावर देखील राज ठाकरे यांनी लक्ष करत मनसे आणि शिवसैनिकांना मतदान केंद्राबाहेर लक्ष ठेवण्याचे सांगितले. तसेच भाजपचे अण्णामलई यांनी केलेल्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यावर देखील राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com