Mumbai-Agra Highway Accident: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! ७ वाहनांचा चेंदामेंदा; भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली

Mumbai-Agra Highway Accident 7 Vehicles Damaged: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात भीषण अपघात झालाय. एका वेगवान ट्रकने नियंत्रण गमावल्याने सात वाहनांचा चेंदामेंदा झालाय.
Mumbai-Agra Highway Accident 7 Vehicles Damaged
MUMBAI AGRA HIGHWAY ACCIDENT: SEVEN VEHICLES COLLIDE IN MASSIVE CRASH AT MANPUR BHERU GHATSaamtv
Published On
Summary
  • मुंबई-आग्रा हायवेवर मानपूर भेरू घाटावर भीषण अपघात

  • भरधाव ट्रकने नियंत्रण गमावल्याने सात वाहनांची टक्कर

  • पिकअप वाहन थेट कारवर चढल्याने परिस्थिती अधिक गंभीर

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटावर भीषण अपघात झाला. इंदूरमधील महू येथे सात वाहनांची टक्कर झाली असून पूर्ण चेंदामेंदा झालाय. घाटावरील तीव्र उतारावर हा अपघात झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, एका भरधाव येणाऱ्या ट्रकने उतारावर नियंत्रण गमावलं. त्यामुळे ट्रकने समोरील आयशरला धडक दिली. धडक लागताच आयशर त्याच्या समोरील कारवर आदळली. त्यानंतर आणखी एका कार आणि पिकअपची टक्कर झाली, अशाप्रकार महामार्गावर अपघाताचा थरार घडला.

Mumbai-Agra Highway Accident 7 Vehicles Damaged
Beed Accident: मद्यधुंद कार चालकानं दोघांना उडवलं; 2 दुचाकींना धडक देत दुकानात घुसली कार

दरम्यान घटनासथळी पोलीस कर्मचारी दाखल झालेत. वाहनांची टक्कर झालीय. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मानपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी लोकेंद्र हेहोर यांनी दिलीय. महामार्गावरील या भीषण अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी त्यांची आपबीती सांगितली. इंदूरहून हैदराबादला ट्रक घेऊन जाणारे चालक मोहम्मद आरिफ यांनी सांगितले की, वाहनाचे ब्रेक निकामी झाले. एका बाजूला वाहतूक कोंडी झालेली होती. तर दुसऱ्या बाजूला कार आणि मुले होती. त्यामुळे ट्रक दुसऱ्या बाजूला वळला त्यावेळी ट्रक ट्रेलरला धडकला. "आम्ही स्वतःला आणि जनतेला वाचवले.

Mumbai-Agra Highway Accident 7 Vehicles Damaged
Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

राजस्थानमधील कार चालक रघुवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही लेनमध्ये वाहतूक कोंडी होती. आम्ही वाहतूक कोंडीत उभे होतो. दुसऱ्या लेनमधून एक भरधाव ट्रक आला आणि पिकअप ट्रकला धडकला. जो उलटला आणि कारवर पडला. कारमध्ये आम्ही दोघे होतो. सुदैवाने आम्ही दोघेही सुरक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com