Beed Accident: मद्यधुंद कार चालकानं दोघांना उडवलं; 2 दुचाकींना धडक देत दुकानात घुसली कार

Beed Accident: बीडच्या केज शहरात एका मद्यधुंद कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिली. धडकेनंतर कार दुकानात घुसली. या अपघातात तीनजण जखमी झालेत.
Beed Accident:
BEED SHOCKING ACCIDENT: DRUNK DRIVER HITS TWO AND CRASHES INTO SHOP IN KEJ CITYsaamtv
Published On
Summary
  • बीडच्या केज शहरात मद्यधुंद कार चालकानं दोन जणांना जोरदार धडक दिली.

  • दोन दुचाकींना धडक देत कार थेट दुकानात घुसली.

  • कार चालक राम लक्ष्मण धर्मा आणि सोबती धनराज बन्सी चाळक हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमधील केज शहरातील वदर्ळीच्या कानडी माळी चौकात एका मद्यधुंद कार चालकानं दोन जणांना उडवल्याची घटना घडली. दोन दुचाकींना धडक देत कार थेट दुकानात घुसल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) असे कार चालकाचे नाव आहे. कार चालकासोबत अजून एक व्यक्ती कारमध्ये होता. धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) असे त्याचे नाव आहे. हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते.

Beed Accident:
Accident : कोकणात फिरायला आलेल्या पर्यटकांचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

हाती आलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास केज येथील कानडी माळी चौकात हा अपघात झाला. येथे एका स्विफ्ट डिझायर कार चालकाने कानडी माळी चौकातील भगवान बाबा चबुतऱ्याजवळ कानडी माळीकडे वळत असताना एका मोटार सायकलीला मागून धडक दिली. त्या दुचाकीवर बसलेली महिला जखमी झाली. आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) असं जखमी झाल्या महिलेचं नाव आहे.

Beed Accident:
Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

दुचाकीला धडक झाल्यानंतर कार चालक भरधाव वेगात कार पळवून नेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी उजव्या बाजूला असलेल्या दोन दुकानांना धडक दिली. या अपघातात दुकाना समोर उभ्या असलेल्या दोन दुचाकीचं नुकसान झालं. यात एक स्कुटी क्र. (एम एच-४४/ए डी-९४८०) आणि मोटार सायकल क्र (एम एच-२५/एस-१७२३) यांचे नुकसान झाले. या अपघातात विद्यार्थ्याच्या सायकलची नुकसान झाले. तर अपघात काही नागरिक देखील व विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघात दुचाकीवर मागे बसलेल्या आशाबाई धोंडीबा राऊत ( रा. समर्थनगर केज) आणि कारचालक राम लक्ष्मण धर्मा (रा. मेंढक तेलंगणा ) आणि त्यांच्यासोबत असलेला धनराज बन्सी चाळक ( रा. लव्हूरी ता. केज) हे तिघे जखमी झालेत. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घट्नास्थळी झाले. निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, दत्तात्रय बिक्कड, राजू वाघमारे, बाळासाहेब अहंकारे, शिवाजी कागदे, त्रिंबक सोपने, संतोष गित्ते, गोरख फड, तांबारे यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com